आपला भारत देश

सुदीप्ती सरकाळे, गौरी तांबे, 6 वी ब

Mar 21, 2026 - 15:15
Mar 24, 2026 - 12:36
 3
आपला भारत देश

आपला भारत देश 

- सुदीप्ती सरकाळे, गौरी तांबे, 6 वी ब


आपण भारत देश जपूया,
प्रिय भारतासाठी लढूया,
प्राणाचे बलिदान देऊया,
प्रिय भारत गीते गाऊया.

भारतात खुशाल राहूया,
आनंदाने जीवन जगूया,
भारतात या झाडे लावूया,
जीवनसृष्टी निर्माण करूया.

दुश्मनांना लढा देऊया,
भारत मातेची शान राखूया,
झेंड्याचाही मान ठेवूया,
सर्वांनाही पठवून देऊया.

झेंडा आपला हातात धरूया,
स्वतंत्र हे भारत सदा ठेवूया,
भारताला या सिद्ध करूया,
भारत मातेला सुखात पाहूया.