जसे ज्याचे कर्म तसे फळ देई ईश्वर
शुभम गवळी, 6 वी ब
दिनांक. 14.8.2025 रोजी आमचा सायन्स पेपर होता. सीबीएससी पॅटर्न असल्यामुळे आम्हाला थोडे समजत नसेल. म्हणून सर आम्हाला इंग्रजीचे रूपांतर हिंदी मराठीमध्ये सांगत. त्या दिवशी आमच्या सायन्स पेपर होता म्हणून आम्हा संगळ्यासाठी सर वर्गात आले आणि आम्हाला पेपर सांगत होते. तेव्हा सरांच्या हातात पेपर व खाली उत्तर पत्रिका होती. राहुल नावाच्या मुलांने ती पाहिली. सर पेपर सांगण्यात मग्न होते. राहुलने त्यांचा फायदा घेऊन. त्या उत्तर पत्रिकेतील उत्तर पाहून लिहिले. आमचा पेपर संपला. आम्ही त्याला विचारले तुझा कसा गेला सायन्स चा पेपर. तो म्हणाला खूप सोपा होता. कसा काय तुला पेपर सोपा गेला. आम्हाला तर थोडा अवघड गेला आणि तू तर काहीच अभ्यास केला नाही. मग कसा काय गेला तुला पेपर सोपा. मला शिकवलेलं सर्व आठवते. आम्ही त्याला म्हणालो तू काल कोणाला पेन व वही दिलीस हे तुझ्या लक्षात राहत नाही. तर तुला एवढा दिवसाचे कसे काय आठवले? तू काहीतरी केलस. तो म्हणाला जेव्हा सर पेपर सांगायला वर्गात आले तेव्हा त्यांच्या हातात प्रश्नपत्रिका होतीच. पण उत्तरपत्रिका ही होती आणि सर आपल्याला जेव्हा सांगत होते. त्याचा फायदा घेऊन मी सर्व पाहून लिहिले. हा! असं आहे तर! आमचा निकालाचा दिवस उजाडला. आम्ही सर्वजण आनंदीत होतो. निकाल लागला आम्हा सर्वांना चांगले मार्क्स मिळाले. पण राहुल मात्र दुखी होता. आम्ही त्याला विचारलं तू का दुखी आहेस. तो म्हणाला, “म्हणाला मला माझ्या कर्माची फळे भेटले आहे.’’ आम्ही त्याला विचारले कसले कर्म कसले फळ. तो म्हणाला जेव्हा मी ते उत्तरपत्रिकामध्ये पाहून लिहिले ती उत्तर पत्रिका सातवीची होती. म्हणून मला सर्वात कमी मार्क मिळाले आहेत. मी आता पासून कधीही चिटिंग करणार नाही. व कोणाचे ही पाहून लिहिणार नाही. तात्पर्य-जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देईल ईश्वर.