Annual Results and Prize Distribution Ceremony 2025-26

Annual Results and Prize Distribution Ceremony 2025-26

Apr 2, 2026 - 09:54
Apr 2, 2026 - 10:05
 7
Annual Results and Prize Distribution Ceremony 2025-26
1 / 38

1. Annual Results and Prize Distribution Ceremony 2025-26

पीएम श्री जेएनव्ही गढी: वार्षिक निकाल आणि पारितोषिक वितरण सोहळा (२०२५-२६)
PM SHRI JNV  GADHI शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा वार्षिक निकाल उत्साहात जाहीर करण्यात आला. प्रास्ताविक परीक्षा विभाग प्रमुख श्री. अरुण सर यांनी केले, तर निकाल सर्व वर्ग शिक्षक यांनी आपल्या वर्गाचा निकल जाहीर केला.  याप्रसंगी सर्व वर्ग शिक्षक आणि सदन प्रभारी तसेच उप सदन प्रभारी  उपस्थित होते. माननीय प्राचार्य श्री. विजयकुमार भोस सर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. 
या  वार्षिक परीक्षेत समृद्धी हुंबे (इयत्ता ८ वी ब) हिने ९७.१७% गुण मिळवून 'विद्यालय टॉपर' होण्याचा मान पटकावला. वर्गांच्या कामगिरीत इयत्ता ७ वी ने सर्वाधिक ८३.२६% निकालाची नोंद केली. सदन  निहाय निकालात अरावली  सदनाने  ७७.६३% गुणांसह प्रथम क्रमांक, तर उदयगिरी सदनाने  द्वितीय क्रमांक पटकावला.
इयत्तानिहाय प्रथम क्रमांक मिळवणारे विद्यार्थी:
६ वी: धनश्री देवकाते (अ), आरोही डोके (ब)
७ वी: कार्तिकी सानप (अ), शिवराज नाईकनवरे (ब)
८ वी: मयुरी वऱ्हाडे (अ), समृद्धी हुंबे (ब)
९ वी: मयुरी गोपाळघरे (अ), प्रणवी परजणे (ब)
११ वी: साई पवार (अ), श्रावणी सिरसाट (ब)