विचार कर त्या बापाचा
सिद्धी उजगरे, 9 वी अ
विचार कर त्या बापाचा
- सिद्धी उजगरे, 9 वी अ
कधी विसरू नकोस त्या बापाला पोरी
ज्याने गाळला रात्रंदिवस घाम
आणण्याकरिता तुझी ती एक बाहुली
ज्याने रक्त गाळले फार
विचार कर त्या बापाचा
जो राहिला दिवसों - दिवस उपाशी
फक्त तुझे पोट भरण्यासाठी
अगं नको करू असा विचार
की तू आहेस त्याला नकोशी
त्याचे सारे जग तू आहेस
तो जगतोय तुझ्याचसाठी
विश्वास आहे त्याला की शिकून
तू होशील खूप मोठी
विचार कर त्या बापाचा
ज्याचे कधी फेडू शकणार नाहीस तू उपकार
फक्त तुला खुश पाहण्यासाठी
ज्याने कष्ट केले अपार
इच्छा आहे त्याची
तुला शिकवून मोठं करण्याची
काळ्या कोटात तुला
लाल दिव्याच्या गाडीत पाहण्याची
तुझ्या आनंदापुढे त्याला
पर्वा नाही कोणाची
विसरुनी त्याचे दुःख सारे
तो सुख आणून ठेवीन तुझ्या चरणाशी
नक्कीच येईल तो दिवस
जेव्हा करशील तू त्याची ताठ मान
फक्त एक लक्षात ठेव पोरी
कधी करू नकोस त्याचा अपमान...