माझे अन्नदाते

स्वरा सावंत, 6 वी ब

Mar 27, 2026 - 12:34
Mar 27, 2026 - 12:42
 3
माझे अन्नदाते

माझे अन्नदाते

 - स्वरा सावंत, 6 वी ब 

आईने शिकवलं
बोट धरून चालायला,
तर बाबांनी शिकवलं
स्वालंबी बनायला. 
आईने शिकवलं
हसत खेळत राहायला,
तर बाबांनी शिकवलं
मुलांना न डगमगता
संकटांना सामोंर जायला. 
माझ्या बहिणीने शिकवलं
मला जगाशी संघर्षाने लढायला
तर भावाने शिकवलं
मला प्रत्येक क्षणाचा
आनंद घ्यायला. 
माझ्या आजीने शिकवलं
प्रत्येकाशी प्रेमाने वागायला. 
तर आजोबांनी शिकवलं
मला जीवन जगायला. 
हे सर्वांनी मिळून
शिकवलं
मला जगायला आयुष्य.