माझी मराठी
ज्ञानेश्वरी सानप, 7 वी अ
Mar 23, 2026 - 09:14
Mar 24, 2026 - 12:33
1
माझी मराठी
- ज्ञानेश्वरी सानप,7 वी अ
माझी मराठी आहे बोलकी
मराठी माझी भावनांचा अर्थ देणारी
अनेक बोलीमध्ये बोलली जाते,
माझी ही माय मराठी
अनेक राष्ट्रात गाजली
अनेक शब्दांनी भिजली,
अनेक कशिदयांनी सजली
माझी ही माय मराठी.
महाराष्ट्राचा अभिमान मराठी
ज्ञानाचा सागर मराठी
सुवर्ण मोत्याची माळ मराठी
माझी ही माय मराठी
माझी मराठी पवित्र झाली
भजन कीर्तन आणि ओव्यांनी,
अनेक संतांच्या तोंडूनी समृद्ध झाली
माझी ही माय मराठी.