विठ्ठलाचं रूप तू माझ्या मायबापा

सुचिता सुदाम वरकटे , 10 ब

Mar 21, 2026 - 15:03
Mar 24, 2026 - 12:36
 2
विठ्ठलाचं रूप तू माझ्या मायबापा

विठ्ठलाचं रूप तू माझ्या मायबापा


- सुचिता सुदाम वरकटे 10, ब


उन्हात सावली तू,
पावसात निवारा,
अंधारात उजाड,
तूच मार्गदाता.

विठ्ठलाचं रूप तू
माझ्या मायबापा,

दुःखाच्या वादळाची ही
काजळी रात
तिथे उगवलासी, बनुनिया
दुःखाचा दिस,
खऱ्या बु-यातील  दाखवलासी
फरक, तूच जन्मदाता.

विठ्ठलाचं रूप तू
माझ्या मायबापा,

अरे कसा हा रचलास
नशिबाचा खेळ,

पुढे मरणाचं दार
तर उरात जगण्याची आस,
आपल्यासी वैर झाले,
परके खास.

माऊलीच्या रूपात आला
तू, बनुनिया सर्व सुख
तुझ्या मायेपुढं, कसलीही दुःखाची गाथा.
विठ्ठलाचं रूप तू माझ्या मायबापा