बाप

वैष्णवी चादर, 10 वी  ब

Mar 23, 2026 - 09:01
Mar 24, 2026 - 12:33
 2
बाप

 बाप

  - वैष्णवी चादर, 10 वी  ब

किती लिहू आणि काय लिहू
या जन्म दिल्या बापासाठी,

मला जन्म दिल्यापासून कर्जात आहे तो
स्वतः फाटके कपडे घालून आम्हाला सुखी ठेवत येतो,

स्वतः कष्ट करून ह्या जगात पोट भरतोय तो
त्याचे दुःख अंथरुणात व्यक्त होत आहे तो,

आमच्या आनंदात आनंदी राहतो तो
माझ्या जीवनाचा आधार बनतो तो,

माझ्यासाठी सावली बनतोय तो
माझ्यात त्याचे स्वप्न बघतोय तो,

माझ्यासाठी दिवस रात्र झटतोय तो,
बाप नावाचं कोड समजून समजना अवघड असतं वो,

जो कधीही आपल्या भावना व्यक्त नाही करत वो.