आई

संस्कृती सरवदे, 9 वी  ब 

Mar 23, 2026 - 08:59
Mar 24, 2026 - 12:34
 2
आई

आई


- संस्कृती सरवदे, 9 वी  ब 


तू एक रास आहेस,
माझ्या जीवनाचा ध्यास आहेस

जीवनातील आठवण तू,
आनंदाची साठवण तू !

आयुष्याचे शिक्षण तू
मायेचे लक्षण तू

जीवनापासून ठेवून दूर मला आहेस तू
दाखवून मनाला सुख खुश दुःखी असतेस तू

स्वप्नातील असं तू,
जीवनाचा श्वास तू

केलास तू माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण,
कसे फेडू मी तुझे एवढे मोठे ऋण

खूप कष्ट केलेस, आता थांब जरा
स्वतःसाठी एकदा जाऊन गुण पहा

आई..
सोडून जाऊ नको कधी आम्हास
तुझ्याविना सूने आपले निवास