पवित्र मंदिर नवोदय
समृद्धी ननवरे, 8 वी ब
नवोदय विद्यालय हे एक पवित्र स्थान आहे. येथे मूर्तींच्या ऐवजी शिक्षक असतात आणि भक्तांच्या रूपात विद्यार्थी असतात. पंडितांच्या रूपात आदरणीय प्राचार्य सर असतात, तर सेवकांच्या रूपात स्वच्छता करणारे काका-काकू असतात. हे सर्वजण आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असतात. विद्यार्थी हे भक्त असून ते शिक्षकांची—म्हणजे ज्ञानरूपी मूर्तीची—आराधना करतात. प्राचार्य सर संपूर्ण शाळेचे व्यवस्थापन करतात, जसे पंडित मंदिराचे संचालन करतात. ते शाळेची स्वच्छता, शिस्त, शिक्षकांची व विद्यार्थ्यांची काळजी घेतात आणि सर्वांच्या हितासाठी कार्य करतात.
विद्यालयातील सर्व कर्मचारी आपापले मोलाचे योगदान देतात. शाळा स्वच्छ, सुंदर व सुव्यवस्थित राहावी यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. जसे मंदिरातील सेवक भक्तांसाठी प्रसाद व भोजनाची व्यवस्था करतात, तसेच नवोदयमधील मेस कर्मचारी विद्यार्थ्यांच्या भोजनाची जबाबदारी घेतात. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच हे पवित्र स्थान घडते—म्हणजेच नवोदय विद्यालय.