नदीचे आत्मकथन: मी बोलते नदी
दुर्गा हातागळे, 11वी अ
नदी बोलते म्हणजे सर्व जगाला पाणी देणारी, सर्वांची तहान भागवणारी आणि सर्वप्रथम एखाद्या सजीव मनुष्याला जीवदान देणारे, अशी मी नदी बोलते. हो नदी.. सर्वप्रथम मला निसर्गाने फारच सुंदर सौंदर्य दिले आहे. मी सर्व सजीव प्राण्यांना जीवनदान देते आणि मी सर्व पक्षी, प्राणी व माणसे या सर्वांची तहान भागवते. मला कधी-कधी फार छान वाटते की, मी सर्व सजीवांची फार मदत करते व माझ्या भोवताली कित्येक झाडे, फळे, पक्षी यांना पाण्याची मदत करते. पण मला काही लोक प्रदूषित करण्याचा प्रयत्न करतात आणि मग मला असं वाटते की, मला असं करू नये. कारण मी सर्वांना पाणी देऊन खुश ठेवते आणि तुम्ही माणसे मला खूप घाण बनवायला निघालात. मी नदी अशी आहे की, मला कोणीच असं समजू नये की, मी माझा विचार करते, पण असं काही नाही. मला लोकांना दान द्यायला फार आवडते आणि म्हणून कोणताही माणूस असो, कोणी पण असो, मला सगळे सारखे आहेत आणि मला दूषित करू नका. कारण मी जर दूषित झाले तर मग कोणाला मदत पण करता येणार नाही. म्हणून मला आपण संकटात टाकू नका आणि मला फार अशी इच्छा आणि अशी अपेक्षा आहे की, मी जर नसेल तर आज कोणी ही जीव जीवंत राहू शकत नाही. असे म्हणतात की जल ही जीवन आहे. पण हे काय तुम्ही माणसे काय करायला लागलेत? माझ्या अंगावर प्लास्टिक वस्तू टाकतात, धुणे धुतात, कारखान्याचे दूषित पाणी सोडतात. या कारणामुळे मी दूषित होत चाललेले आहे. मनुष्य दोन दिवस जेवणाशिवाय राहू शकतात पण पाण्याशिवाय शक्य नाही. मग आहे ना जल ही जीवन. बदलत्या काळानुसार माणसे पण बदलतात आणि मला जास्त खराब करतात. पण असं करू नका. मला स्वच्छ ठेवा ही काळाची गरज आहे. कारण माणसाने आपल्या पाण्याची काळजी घ्यायला हवी. असा संदेश देते की, जल ही जीवन हे. हा संदेश सर्वांनी पाळावा. अशी विनंती करते व मला लवकरात-लवकर स्वच्छ करा नाहीतर मी इतकी घाण होईल की माझ्यावर मच्छर बसतील, माझ्यामध्ये अळ्या होतील. अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव होतील. यामुळे मला खूप आजार होतील. हे आजार निसर्गामार्फत माझ्याकडे येणाऱ्या सर्व सजीवांना होतील. यामुळेच मला त्रास देऊ नको रे! माणसांनो. तुम्ही चांगला निर्णय घ्या व मला स्वच्छ सुंदर बनवा. बिलकुल मला जसे निसर्गाने सौंदर्य दिले तसंच ठेवा. मी खूप मोठ्या संकटात आहे. मला असे वाटते की, माझ्यामुळे सजीव जगतात. पण त्यांनी पण मला जगवू द्यावे. कारण मी जर नष्ट झाले तर तुम्हा लोकांना याचा खूप त्रास होईल. मला वाटते तुम्ही हा विचार सोडून दिला आहे पण माणसांनो मी तुम्हा लोकांना एकच संदेश देत राहीन. मला स्वच्छ करा आणि तुम्ही पण स्वच्छ आणि सुंदर जीवन जगा व येणाऱ्या पिढीला वाचवा. मला वाचवाल तर तुम्ही वाचाल आणि तुमच्यामुळे सर्व सजीव. मुके जनावरे, उडणारे पक्षी, अनेक प्रकारचे प्राणी. यांना एक पण एक नवीन जीवनदान द्या. हे सगळं माणसाच्या हातात आहे. पाणी हे जीवन आहे, पाणी हे काळाची गरज आहे. पाणी वाचवा, पाणी वाचवा असा संदेश देते.