जे झाले ते चांगल्यासाठी झाले

अनुज काळे, 6 वी ब

Mar 28, 2026 - 12:14
Mar 29, 2026 - 10:30
 3
जे झाले ते चांगल्यासाठी झाले

              राहुल नावाचा मुलगा होता. तो शहरात राहत होता. त्याला पुस्तक वाचायला खूप-खूप आवडायची, परंतु त्याच्यामध्ये विसरभोळे पणा खूप होता. तो त्याच्या गावात गेला. त्याने खूप मज्जा ही केली. तो लहानपणी परीक्षा उत्तीर्ण करायचा. त्याला त्यांच्या गावातून पुरस्कारही मिळाला. परंतु काही  कारणाने तो एकदा पायऱ्यावरून घसरून डोक्यावर पडला. मेंदूला खूप मार लागला. तो तेव्हा सहावीला होता. त्यामुळे त्याला काहीही लक्षात राहायचे नाही. त्याची गावात खूप प्रशंसा व्हायची. त्यामुळे त्याला काही लक्षात रायचे नाही. ते लोक त्याची तुलना त्याच्या मुलासंग करायचे. त्यामुळे त्या मुलाला त्याचा खूप राग यायचा. अगदी ते त्याच्यावर जळायचे देखील. त्याच्या जवळच्या मित्रांना ही गोष्ट जेव्हा कळाली तेव्हा त्याचे भांडे त्यांनी सर्व गावात फोडले. परंतु त्यांचावर त्यांचा विश्वास बसला नाही. त्या रात्री त्यांनी त्याच्या मुलांना खूप मारले. त्यांनी मित्रांची एक मीटिंग घेतली व ते त्यांच्यावर इतके जळाले की, त्याला मरायचा विचार त्याच्या मनात येऊ लागला. अर्पित नावाचा मुलगा मधातच म्हणाला. “तो विसरभोळा आहे. वाक्य काटत शरविल म्हणाला तुला म्हणायचे तरी काय आहे? तुझावर विश्वास ठेवून आम्ही काल खूप मार खालला. अर्पित थोडा रागात येऊन म्हणाला अरे! त्याला आपण चिडवलेले, मारलेले, काहीच लक्षात नसेल. आपण त्याच्या सोबत कपटीपणाने मैत्री करू. त्याला पोहता ही येत नाही. शरविल म्हणाला तू त्याला मारायचा विचार केला आहेस का? अर्पित चा राग शांत झाला व तो म्हणाला हा आपण त्याला गावात आपल्यावर प्रेमाने बोलू.  त्याला नदीत नेऊ व डुबवायचा प्रयत्न  करू तो डुबाय लागला की, आपण आरडा-वरडा करू. त्याच्या वडिलांना सांगू. पण तोपर्यंत तो बुडेल व मरेल ते सगळे वडाच्या झाडाखाली बसले होते परंतु त्यांना माहीत नव्हते की काही अंतरावर राहुल लपून त्यांचे बोलणे रेकॉर्ड करत आहे. काही दिवस गेले उन्हाळ्याची सुट्टी संपत आली. पावसाळा चालू झाला. नदीला पाणी  आले. राहुल विसरभोळा होता. म्हणून तो ती रेकॉर्डिंग विसरून गेला. त्यांनी प्लॅन सक्सेस करायचा म्हणून त्याला नदीवर जायचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी ते सगळे नदीवर गेले. परंतु तो पोहोचलाच नाही व त्याचा जीव वाचला.