खरे का खोटे

मंदार डोरले, 6 वी अ

Mar 28, 2026 - 12:09
Mar 29, 2026 - 10:41
 4
खरे का खोटे


एका गावात दोन भाऊ राहत होते. एकाच नाव ईश्वर दुसऱ्याचे नाव रावण होते. ईश्वर खूप आनंदाने राहत होता तर तिकडे रावणाला दोन वेळचे जेवण मिळता मिळत नव्हते. तर तेही खूप कष्ट करून सुद्धा एके दिवस रावण आपल्या भावाला म्हणाला ईश्वर आपण शहरात जाऊ आणि कष्ट करून पैसे जमा करू. ईश्वर ने त्याला होकार दिला. दोघे शहरात जाऊन खूप कष्ट करू लागले. काही दिवसांनी त्यांच्याकडे खूप पैसे जमा झाले. ईश्वराला वाटले खूप दिवस झाले आपण शहरात राहत आहोत. मला घरची खूप आठवण येते व आपले घरचे सुद्धा आपली खूप  आठवण काढत असतील. आपण आता घरी जाऊन येऊ. रावण ने पण ह्या गोष्टीला होकार दिला. दोघे आपल्या गावाकडे निघाले. वाटेत रावण ईश्वरा मनाला. ईश्वर आपल्याकडे खूप पैसे आहेत. जर ते आपण घरी नेले तर आपले पाहुणे आपल्या कडून तसेच उधार घेतील व पुन्हा देणार नाहीत. ईश्वरलाल हे खरे वाटले. रावण म्हणाला आपण एका जंगला खड्डा करून त्यात पैसे लपवून ठेवू. ईश्वर पण त्याला होकार दिला. त्यांनी ते पैसे लपवले व घरी गेले. एके दिवस रावण मध्यरात्री जंगलात जाऊन त्याने तिथले पैसे चोरले व घरी गेला. दुसऱ्या दिवशी रावण ईश्वरकडे जाऊन म्हणाला मला पैशाची खूप गरज आहे. आपण पैसे काढून घेऊ. ते दोघे जंगलात गेले आणि पैसे शोधले. पण ते सापडले नाही रावण खूप रडू लागला व ईश्वरला मनू लागला. तू पैसे चोरले, रावण ईश्वरला खोटे दोष देऊ लागला. रावण  एका साधूकडे गेला आणि साधूकडे जाऊन दोघे एकमेकांना दोष देऊ लागले. साधू म्हणाला आपण उद्या दिव्य झाडाकडे जाऊन तुमच्या मधला खरा चोर सापडू. दुसरा दिवस उजाडला. सगळं गाव त्या दिव्य झाडाच्या जवळ थांबले होते. रावण ने तर खरे पैसे चोरले होते. त्याने त्याचा मित्र रमेश तो झाडाच्या मागे उभा केला होता. रमेशला रावणने सगळं समजून सांगितलं होतं. साधू आले साधूने दिव्य झाडाला विचारले.   रावण व ईश्वरचे पैसे कोणी चोरले. झाडाच्या मागे असलेला रमेश म्हणाला पापी ईश्वरने पैसे चोरले आहेत. तर ईश्वर म्हणाला मी पैसे चोरले नाहीत. साधू म्हणाला पापी ईश्वर तूच पैसे चोरले आहेत. थोड्या वेळानंतर ईश्वरला रावण चा डाव कळाला. त्याने दिव्य झाडामागे जाळ लावला. जाळ लावल्यानंतर रावांचा मित्र जळत-जळत बाहेर येऊन म्हणाला मला माफ करा. मला रावण म्हणाला म्हणून मी असे केले आणि खरंतर रावणाने पैसे चोरले. रमेश जळत-जळत तेथेच मरून पडला आणि रावणाला खूप मोठी शिक्षा देण्यात आली. बोध -कधीही लोभ करू नये.