आई असते प्रेमाचे दरवळ

श्रुती थेटे, 8 वी अ

Mar 27, 2026 - 13:32
Mar 27, 2026 - 13:36
 4
आई असते प्रेमाचे दरवळ

आई असते प्रेमाचे दरवळ

- श्रुती थेटे, 8 वी अ 

तिच्या बरोबरीच्या
प्रत्येक क्षणासाठी होते माझी तळमळ
आई मायेची सावली
किती थोर ती माऊली. 
कोणत्याही संकटात हार मानणार नाही
ती व्यक्ती ती स्त्री
म्हणजे फक्त आणि फक्त आई. 
अगं तुझ्या प्रत्येक स्मितास
यात तुझ्या हरेक शब्दात
मी नेहमी शोधीन प्रेमाचा गोडवा
तुझ्या ओठावर हसू कायम राहो. 
तुझा आयुष्य फुलासारख फुलं
आता देवाकडे एकच मागणं
माझ्या आईचं आयुष्य
असो सुगंधी स्वप्न
म्हणूनच
ए आई तुझ्या विना
मला करमत नाही.