आई बाबा
प्रगती वडमारे, 11 वी अ
आई बाबा म्हणजे जे की आपल्या मुलावर माया लावणारे काळजी करणारे, खूप सगळं प्रेम देणारे आपल्या सुखा समजणारे चुकलो तरी माफ करणारे आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे स्वतःपेक्षा जास्त आपला विचार करणारे कोण तर ते म्हणजे आपले आई आणि बाबा. आपण लहानपणापासून आपला सांभाळ करणारे आपल्याला चालायला, बोलायला व राहायला शिकवणारे. पहिले शिक्षक, पहिले गुरु, आई-बाबा. ते आपल्यासाठी फार कष्ट करतात उन्हा-तानात राबणारे. रानात वण वण करणारे. कोणासाठी तर फक्त आपल्या मुलासाठी. ते आई-बाबा जे की स्वतःसाठी कधीच जगले नाही. हो ते फक्त जगतात तर आपल्या मुलासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी. अहो जे आई-बाबा एक वेळचे जेवण कमी करतात पण आपले सगळे हट्ट पुरवतात. जे हवं ते तात्काळ आणतात, कसलाही विचार न करता. आपलं शिक्षण व्हाव यासाठी खूप आवड कष्ट करतात. आपली आई आपण लहान असताना सकाळी इतक्या लवकर उठून आपलं सगळं काम आवरुन आपल्याला शाळेत पाठवतात. लहानपणा पासून तर आपण मोठे होईपर्यंत आपली किती काळजी असती हो त्यांना. आपण जर दोन मिनिटं त्यांच्या डोळ्यासमोर नसलो की आपली फार काळजी लागते त्यांना. असे आई-बाबा आपल्या भावना समजणारे, आपले खरे देवता, खरे विठ्ठल-रुक्मिणी, आपले आई-बाबा आपल्यासाठी फार कष्ट करणारे आणि सतत प्रेरणा देणारे.स्फूर्ती देणारे. आपला आत्मविश्वास वाढवणारे. आपल्याला यश आणि अपयशाची जाणीव करून देणारे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एका चांगल्या मार्गावर घेऊन जाणारे. एक चांगली दिशा देणारे आणि आपल्याला सतत योग्य मार्ग दाखवणारे मार्गदाता. आपण कायम आई-बाबांचा विचार करा. म्हणून सांगते. आई बाबांचे स्वप्न पूर्ण करा. आई-वडिलांचे किती पण कौतुक केले तरी पण कमीच आहेत. कारण आई-वडील प्रत्येक मुला-मुलींच्या जीवनात फार मौल्यवान दागिना असतात.