माझं विद्यापीठ
अस्मिता लांडगे, पीजीटी रसायनशास्त्र
Mar 28, 2026 - 12:01
Mar 29, 2026 - 10:46
3
माझं विद्यापीठ
- अस्मिता लांडगे, पीजीटी रसायनशास्त्र
क्षणाचा आनंद थोडं दुःखही मिळालं,
मिळालेल यश हृदयात नेहमी राहीलं.
लायब्ररीत शांतता पुस्तकाची मजा,
क्लासरूममध्ये शिक्षकाची गंभीर वाचा.
कॅन्टीनची गंमत, टिफीनची चव,
अनुभवाचा हा प्रवास, काहीतरी खास नवं.
निसर्गाच्या सावलीत, दडलेले क्षण,
दुःख सुखातही शिकवण देणारे मन.
आज जरी हे क्षण वेळेसोबत जातील,
पण आठवणी म्हणून आयुष्यभर साथ देतील.