मुलीचे मनोगत

अनुजा लादे, 11 वी ब

Mar 28, 2026 - 12:27
Mar 29, 2026 - 10:23
 3
मुलीचे मनोगत

                        मी एक मुलगी आहे याची जाणीव मला सारखी-सारखी का करून दिली जाते. का? आम्हाला पुन्हा-पुन्हा ऐकावे लागते इकडे जाऊ नको! मुली फिरत नाहीत.  बाहेर शिकू नको तू एक मुलगी आहेस. असे कपडे घालू नको, तू एक मुलगी आहेस. रस्त्याने हसत जाऊ नकोस, खाली मान घालून चालायचं, काही माणसं मुलीला या त्यांच्या मणण्याप्रमाणे वागू देत नाहीत. त्यांना त्यांच्या आयुष्य का जगू देत नाहीत. एखाद्या वर्गामध्ये मुलीला सहज जर म्हटलं की, जर तुम्हाला मनुष्य जन्म घ्यायची संधी मिळाली तर तुम्ही कोणाचा जन्म घेताल तर प्रत्येक मुलगी ही मुलाचा जन्म घेणार. परंतु तोच प्रश्न जर मुलांना विचारला तर एकही मुलगा मुलीचा जन्म घेणार नाही. मुलांची इच्छा शिकायची नसतानाही त्यांना चांगल्या शाळेत टाकतात. त्यांना जे हवं ते घेणार परंतु मुला-मुलींची शिक्षणाची इच्छा असून सुद्धा तिला शिकू देत नाहीत. बाहेर जाऊ नये मुलींनी असं म्हणतात. का? स्वप्न फक्त मुलांनीच साकार करायचे असतात का? मुलींना त्यांचे स्वप्न साकार करण्याचा   पण अधिकार नाही का? जर एखादा घरी स्त्री नोकरी करत असेल तर त्या घरच्या स्त्रिया, मुलींना फालतू म्हणून म्हटलं जातं. का तर त्या माणसाची कामे करतात म्हणून. आम्ही कितीही जपून राहू दे तरी सर्वांच्या तोंडी एकच ती मुलगी कशी राहते. घरच्यांचा काही धाक नाही. मुलींनी काही केले तरी करू दे. पण मुलींना मात्र कपड्या वरून सुद्धा पारखतात. लग्नाआधी म्हणतात काय शिकायचं आहे ते सासर घरी जाऊन शिकायचं. पण लग्नानंतर सर्व इच्छाच संपतात कधीकधी तर वाटतं का मी जन्माला आले. काय पाप केलं होतं मी. हे फक्त मुलींनाच भोगावे लागतं. काही मुलींना तर स्वप्न बघायची पण बंदी आहे. मला फक्त एकच प्रश्नाचे उत्तर हवे आहे ते म्हणजे खरंच भारताला स्वातंत्र्य भेटले का? आणि जर नसेल भेटले तर कधी भेटणार आम्हाला स्वातंत्र्य? आमची अवस्था पिंजऱ्यातल्या पक्षासारखी झाली आहे. त्यांना जसे पिंजऱ्यात ठेवतात तसेच आम्ही मुली देखील एका पिंजऱ्यातच आहोत. आम्हाला पिंजऱ्याच्या बाहेरच जग पाहायचा आहे. आकाशामध्ये उंच भरारी मारायची आहे.