शिक्षण म्हणजे काय
सिद्धेश बनसोडे, 7 वी ब
शिक्षण म्हणजे फक्त पुस्तके ज्ञान नव्हे, तर मनुष्याला माणूस बनवणारे शक्ती आहे. शिक्षण आपल्याला विचार करायला, निर्णय घ्यायला आणि योग्य अयोग्य यातील फरक ओळखायला शिकवते. शिक्षणामुळे आपण स्वतःला घडवतो, समाजासाठी काहीतरी करण्याची क्षमता तयार होते, आजच्या बदलत्या काळात शिक्षण म्हणजे आयुष्यभर चालणारा प्रवास. जो आपल्याला नवीन ज्ञान नवीन संधी आणि नवीन दृष्टिकोन देतो. शिक्षण म्हणजे जीवन समजून घेण्याची आणि स्वतःला घडवण्याची एक सतत चालणारी प्रक्रिया म्हणूनच शिक्षण म्हणजे उज्वल भविष्याचा पाया आणि प्रत्येकाने शिक्षणाला आपल्या जीवनाचा मुख्य भाग बनवणे आवश्यक आहे.