ए. पी. जे. अब्दुल कलाम – आकाशाला स्पर्श करणारा मिसाईल मॅन

सागर शेंडगे, पीजीटी भौतिकशास्र

Mar 28, 2026 - 12:31
Mar 29, 2026 - 10:17
 3
ए. पी. जे. अब्दुल कलाम – आकाशाला स्पर्श करणारा मिसाईल मॅन

                                           रामेश्वरम या छोट्याशा गावात एक साधा, शांत स्वभावाचा मुलगा राहत होता—अवुल पाकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम. घराची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, पण या मुलाच्या डोळ्यांत स्वप्न मोठी होती. लहानपणीच कलाम पहाटे उठून वडिलांना मदत करत आणि मग पुस्तकांचा गट्ठा हातात घेऊन शाळेकडे धावत जायचा. त्याला विज्ञानाची विशेष आवड होती. इतर मुलं खेळत असताना तो मात्र आकाशाकडे पाहत बसायचा आणि विचार करायचा—
“पक्षी उडू शकतात… मग माणूस का नाही?”
या प्रश्नानेच त्याच्या मनात उड्डाणाचे, आकाशाला स्पर्श करण्याचे स्वप्न निर्माण झाले.
काही वर्षांतच अभ्यास, कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर कलाम यांनी ISRO मध्ये प्रवेश मिळवला. तिथे त्यांनी भारताचे पहिले उपग्रह प्रक्षेपण वाहन SLV-3 यशस्वी केले. पुढे DRDO मध्ये त्यांनी भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे नेतृत्व केले आणि देश अधिक सक्षम बनवला. यामुळेच त्यांना “मिसाईल मॅन ऑफ इंडिया” म्हणून ओळख मिळाली. इतके मोठे यश मिळूनही कलाम अतिशय साधे आणि नम्र होते. त्यांना मुलांशी बोलायला खूप आवडत असे. ते नेहमी सांगायचे—
“मोठी स्वप्न बघा. स्वप्न विचार निर्माण करतात, आणि विचार कृती घडवतात.”
सन 2002 मध्ये ते देशाचे राष्ट्रपती झाले—लोकांचे राष्ट्रपती. अखेरपर्यंत ते विद्यार्थ्यांना प्रेरणा देत, भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत राहिले. आजही त्यांचे आयुष्य आपल्याला शिकवते की—स्वप्न मोठे असावीत, मेहनत प्रामाणिक असावी, आणि मन नम्र असावे.