परिवर्तन या जगात
सानिका देवकते, ७ वी ब
Mar 26, 2026 - 11:32
Mar 26, 2026 - 11:35
2
परिवर्तन या जगात
- सानिका देवकते, ७ वी ब
झाले आता कारखाने, जिथे होती नदी एकेकाळी,
ओसाड झाली जागा, जी सुपीक होते त्याकाळी.
जिथे खेळ खेळत असतील लपाछपी लहान मुलं कधीतरी,
आता खेळतात फ्री फायर मुलं प्रत्येक घरोघरी.
बदलल हे जग सार कशी झाली ही जादूगिरी,
आता झाले शहरवासी, जे होते गावकरी.
मदतनीस असेल तंत्रज्ञान जरी,
दुरावली माणसं त्यांच्यामुळेच सारी
झाला आहे अशा प्रकारे परिवर्तन या जगाचं,
सृष्टीसाठीच घातक ठरले तंत्रज्ञान या युगाचं.