शिवराय
समीक्षा कांबळे, शौर्या राऊत, 6 वी ब
Mar 21, 2026 - 14:54
Mar 24, 2026 - 12:37
2
शिवराय
- समीक्षा कांबळे, शौर्या राऊत, 6 वी ब
राजा आहे तो एकच महान,
त्याचे नाव शिवराय छान
करुनी स्वराज्य निर्माण,
राजा शिवराय महान.
शिवनेरीवर सिंह जन्माला,
पहिला किल्ला तोरणा जिंकला.
जगभर प्रसिद्ध राजा आमचा
जन्म घेतला, पोटी जिजाऊच्या
मावळे होते, जीवाभावाचे.
करती रक्षण स्वराज्याचे,
मान राखी शिवरायांचे,
मदतीस तयार राहायचे.
रयतेसाठी शपथ घेतली,
दिले रयतेसाठी प्राण.
शिवराय आले जन्मा,
म्हणून मिळतो आम्हा मान.