महामानव

संस्कृती सरवदे, 9 वी ब

Mar 23, 2026 - 08:41
Mar 24, 2026 - 12:35
 2
महामानव

महामानव


- संस्कृती सरवदे, 9 वी ब

पारतंत्र्यात राहून घोटाळा घुटमळला श्वास त्याचा
दलितांसाठी  स्वातंत्र्य हा ध्यास त्याचा
काही शब्द म्हणत स्वप्न रंगविले त्याने
शिका संघटित व्हावं संघर्ष करा
या शब्दांनी आम्हाला जगायला शिकविले त्यांनी

करावे किती उपकार त्याचे
जीवन दिले त्यांनी आम्हास
आता पुन्हा होत आहे राजेशाही
रिकामे होत आहे निवास

ज्ञान सूर्य उगवला देशामध्ये
अंधाराला दिला उजेड
समतेचा मंत्र दिला जनतेला
आंबेडकरांचे अमर संदेश