एकदा तरी..
वैभव देशमाने, जे. एस.ए.
एकदा तरी..
- वैभव देशमाने, जे. एस.ए.
एकदा तरी आयुष्यात कोणी असे भेटावे,
ज्याला आपल्या मनातले सर्व काही सांगावे
सांगता सांगता आयुष्य पूर्ण करून जावे,
आणि सरतानाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे.
ज्याला घेऊन सोबतीने खूप खूप चालावे,
चालता चालता दूरवर खूप खूप धावावे.
पण धावल्यावरही आधारासाठी त्याच्याकडेच पहावे,
एकदा तरी आयुष्यात कोणीतरी असे भेटावे.
दुःख त्याचे आणि अश्रू माझे असावे,
तर सोबतीने त्याच्या खूप खूप रडावे.
आणि आसवांच्या हुंदक्यात सर्व दुःख विसरावे,
आनंद त्याचा आणि हसू माझे असावे.
त्याच्यासाठी मी जगतच राहावे,
आणि त्याच्यासाठी जगतानाच आयुष्य संपावे.
एकदा तरी आयुष्यात कोणी असे भेटावे,
ज्याच्या सोबत शिक्षणाने सुकवावे.
उन्हात त्यांनी सावली तर पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबाने मी चिंब भिजवून जावे.
एकदा तरी आयुष्यात कोणी असे भेटावे…