होरपळून गेला समाज
सोहम ढोरमारे, 10 वी ब
होरपळून गेला समाज
- सोहम ढोरमारे, 10 वी ब
माझी ही जात माझी ती जात
म्हणत माणूस मानवजात विसरून गेले
जात-धर्म जपता जपता
स्वतःलाच हरकून गेला
ज्या व्यक्तीला समाजाने विषमतेचे डंख दिले
त्यास व्यक्तीने समाजाला समतेचे पंख दिले
दलित वर्गातील एक माणूस
संविधान करून गेला
पण तरीही हा समाज असमतेने होरपळून गेला
धर्मनिरपेक्षता जात ही बंधुता
असे मानवतेचे मंत्र देऊनी संविधान लिहून गेला
2 वर्ष अकरा महिने 18 दिवस
माझा बाबासाहेब झिजूनी गेला
जाती धर्माच्या आंदोलनात
आज माणूस रस्त्याला येऊ लागला
एकमेकांच्या अधिकारावरती प्रश्न करूनही दंगे करू लागला
प्रश्न मला पडतो आहे हा हाच
समाज बाबासाहेबांनी जगाला दिला?
स्वप्न तर होते त्यांचे
की सर्व जाती समानतेने राहाव्यात
मानव जात स्वीकारूनी
धर्मजात एक जुडवाव्यात
ह्याच धर्म जाती असमतेमुळे
माझा बाबासाहेब हिंदुत्वात जन्मूनी बुद्धत्वातून मेला
हे गुण देखीलही हा समाज
असमतेने होरपळून गेला.