नवोदय

सुचिता वरकटे, 10वी ब, दुसरी कविता - दीक्षा वाघ, 10 वी ब आणि तिसरी कविता - नम्रता बंडगर, 10 वी ब

Mar 21, 2026 - 14:58
Mar 27, 2026 - 12:30
 4
नवोदय

नवोदय


- सुचिता वरकटे,10 वी ब


कळेना का दाटते डोळ्यात पाणी,
आभाळ आभार व्यक्त करायला आणि
अनुभव सांगायला माझ्याकडे शब्दाची कमी.
याच नवोदयने लावला आता
मला अभ्यासाचा लळा,
जिथे स्वतःला ओळखणं शिकवलं
जातं, त्या राणपाखराची ही शाळा
हाताला धरून चालायला शिकवणारे
ते आई-वडील आणि
कोणत्या रस्त्यावर चालायचं ते
शिकवणारे हे शिक्षक.
नेहमी म्हणत असतात,
“अरे, चांगल्या मार्गाकडे वळा,
बाहेर गेल्यानंतर नवोदयला
सोडण्याचं थोडं दुःख तर आहे,
पण त्यापेक्षाही जास्त
स्वतःवर विश्वास आणि हिम्मत
आहे, कारण
इथली शिकवण नेहमी सोबत आहे

नवोदय 

- दीक्षा वाघ, 10 वी  ब

नवोदय इथे येण्याआधी 
घराबाहेर कधी राहिले नाही
आल्यावर इथे परिवाराची किंमत
कधी कमी, कधी भासली नाही. 
जसं आईच्या हाताची चव
हॉटेल मधल्या जेवणात नाही. 
तसं नवोदय मध्ये भेटतो तो अनुभव
दुसऱ्या शाळेत नाही. 
डोळ्यात पाणी
तरी ते आल्यावरही
होतं फक्त ते नवोदयाला
सोडण्याच्या दुःखाचे नव्हते. 
मला नेहमी वाटायचे
आमचे घरचे सोडता
सगळेच खोटे. 
पण नवोदय मला म्हणाले
तुझा अजून एक परिवार आहे. 
इथे प्रत्येक संकटाशी लढायला
जात होती मित्राची
कसलीही कठीण परिस्थिती
आली तरी हार नाही मानायची. 
डोक्यावर हात ठेवून
आशीर्वाद द्या
तयारी आहे आमची
तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालायची,
आम्ही कुठे जाऊ नेहमी
आठवण येईल
नवोदयास
आणि इथल्या पाच वर्षाच्या अनुभवाची. 

आयुष्य नवोदयचे

 - नम्रता बंडगर, 10 वी  ब 
                                                                                
हे आयुष्य लय सुंदर आहे
राव पण समाज नीट वावरू देत नाही
काय सांगू नाती खूप आहेत
पण एकटेपणा कधी सावरू देत नाही. 
आयुष्य एक तर आहे राव
हसून जगत राहावं
काही गोष्टी आयुष्यात सावरतात
आणि काही गोष्टी आयुष्य बिघडवतात
त्या आयुष्य लय भारी राव
दुखाचे डोंगर येतच राहतील
पण हसून जगू राव. 
सात वर्षांपूर्वी इथे आलेत
चार कपड्याचे जोड व समजून घेऊन
इथे राहू राहू वाटत नव्हतं. 
पण तसं बसा या छोट्याशांना
समजदार हृदयाला समजावलं
काहीतरी करायचंय राव
आयुष्य सावरायचे राव
इथे खूप गोष्टी केल्या
भांडण केली रडले पडले
काही गोष्टी व काही नात्यात
दुरावा देखील आला
कधी कधी वाटतं होतं,
की इथं एकूण निघून जावं
राव पण वाटलं की नंतर
हे आयुष्य भेटणार नाही राव. 
हे आयुष्य कसं जरी असलं
ना रात्री लय भारी राव
सात वर्षे इथे राहिले
या चार भिंतींना आपले घर मानले
इथली मज्जा मस्ती कधी परत भेटणार
नाही राव. 
हे आयुष्य लय सुंदर आहे
राव कधी विसरणार नाही
राव या नवोदयने
मला खूप काही शिकवलंय
राव लहाणाचं मोठं केलंय
या छोट्याश्यानं समजदार हृदयाला
समजूतदार केलं राव. 
एवढ्या आठवणीत स्वतःला
कसं सावरायचं
आई बाबा पासून दूर एकटं कसं राहायचं
स्वतःच्या अडचणी कशा दूर करायच्या
त्या नवोदय ने आयुष्य कसं जगायचं
हे शिकवलंय राव.