आई

वैष्णवी पोकळे, 9 वी ब

Mar 23, 2026 - 08:57
Mar 24, 2026 - 12:34
 2
आई

आई 


- वैष्णवी पोकळे, 9 वी ब


नऊ महिने त्रास सहन करत,
सर्व कुटुंबियांना सांभाळत,
घराला घरपण देत,
जन्म दिलास तू आई.

तुझ्या सर्व उपकारांचे,
लाडाने खाऊ घातलेल्या खाऊचे,
कसे पांग मी फेडायचे,
तूच सांग ग आई.

तुझ्याशिवाय या जगाचे,
सत्य कसे पारखायचे,
कसे संस्काराचे धडे
आम्ही शिकायचे,
तूच सांग ग आई.

एवढीच आहे ग आई इच्छा,
जन्म घ्यावा परत तुझ्याच पोटी,
तुला सदैव नमन कोटी–कोटी,
तुझ्यामुळेच झाले मी मनाने मोठी