आयुष्य

अनुष्का आठवले, 9 वी अ   and second poet by समृद्धी पवार, 9 वी अ

Mar 23, 2026 - 08:51
Mar 26, 2026 - 11:39
 4
आयुष्य

आयुष्य


- अनुष्का आठवले, 9 वी अ  

आयुष्य म्हणजे आहे इंद्रधनुष्यातील सतरंगी रंग
कधी दुःखाचे तर कधी सुखाचे येतात येतच राहतात तरंग

आयुष्य म्हणजे नाही फक्त नशिबाचा खेळ,
यशस्वी होण्यासाठी आपल्यालाही द्यावा लागतो थोडा वेळ

पक्ष्यांना आकाशात उडताना पाहिजे केव्हा?
एक दिवस त्या पक्षासारखाच आपल्यालाही आकाशात उडायचं
आणि आई-वडिलांनी सोसलेल्या प्रत्येक कष्टच ऋण तुम्हालाच फेडायचं 

आयुष्य कितीही किती काळ टिकेल याचा भरोसा नसतो
पण आयुष्याचा प्रत्येक घडावा हा आपल्यालाच
हातात असतो

हारला जरी एक वेळ आयुष्याच्या परीक्षेत
तुमच्या तर हरण्याच्या दुःखाने आयुष्य संपवू नका
कारण प्रत्येक उदयाचा सूर्य नवीन आशा
घेऊन येत असतो
आयुष्यात ज्यांनी तुम्हाला यशाचा मार्ग दाखवला
त्या गुरुजनांचा कधीही अपमान करू नका
आणि जर पोहोचलात यशाच्या शिखरावर कधी
तर गुरूंच्या चरणावरणात मस्त होऊन नक्की
शीश नमवा. 

कारण आयुष्यभर ज्यांनी दिलाय तुमच्यासाठी वेळ
त्यांच्या ऋणफेडण्याची असते हीच खरी वेळ

म्हणूनच आयुष्य शिकवून खूप खूप मोठे व्हा,
आणि आयुष्य स्वाभिमानाने जगण्याचा हा प्रयत्न करा. 

आयुष्य

- समृद्धी पवार, 9  वी अ 

आयुष्याच्या या वळणावर
सोबतीला कोणीही नसतं,
सावलीलाच सोबत घेऊन
आयुष्य जगायचं असतं. 

आयुष्यात असं असले काटे
तरीही थांबायचं नसतं,
काट्यांनाच फेकून देऊन
आयुष्य जगायचं असतं. 

कितीही आले अडथळे
तरीही अडकायच नसतं,
त्या अडथळ्यांशीच लढून
आयुष्य जगायचं असतं. 

कितीही लावली आग
 तरीही जळायचं नसतं,
दुसऱ्यांनाच जळवून
 आयुष्य जगायचं असतं. 

 कितीही दाखवल्या चुका
तरीही घाबरायचं नसतं,
त्या चुकांनाच  सुधारून,

आयुष्य जगायचं असतं..