बापाची माया
सृष्टि निवृती साळवे, 10 B
बापाची माया
- सृष्टि निवृती साळवे, 10 वी ब
एक बोट धरून ती चाले पुढ- पुढ
घास भरवताना ही चाले तुरु- तुरु पोर
माझी इवलीशी लेखक कधी मोठी झाली
काल बोट धरून चालणारी आज खांद्या रोज आली
हट्ट करणारी काल
रुसून बसायची
आज रुसत नाही, काही मागतही नाही,
माझी लहानशी लेक
आता समजदार झाली
लोक म्हणतात हो लेक
आहे परक्याचं धन
माहित आहे हो पण
द्यायला नको म्हणते मन
बाप लेकीचं हे नातं
जरा वेगळंच असतं
अश्रू आले जरी डोळ्यात:
बाप लपवत असतं
जेव्हा कळतं लेक आली हो वयाला
डोळ्यातून पाणी टपटप पडतं
मग कोपऱ्यात जाऊन
बाप फूटा -फूटा हो रडतं
आली कन्यादानाची वेळ
बापाचा जीव झाला का तर
डोळ्यात अश्रू असून सुद्धा म्हणतो
मी खुश आहे बरं
लेकीच्या डोळ्यात पाहून अश्रू
आता मला राहवना गेलं
तिच्या गळ्यात पडून
बाप घायाळ झालं
लेक नांदवताना आले
सगळ्यांच्या डोळ्यात आसवं
माझ्या काळजाचा तुकडा
आज चालला सासर